सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांना झळाळी; आज 22kt, 24kt ची किंमत काय?

Gold Silver Rates : सोन्याला सोन्यासारखीच किंमत... चांदीही भाव खातेय... जाणून घ्या सोनं- चांदीचे आजचे दर. नवा दागिना खरेदी करायच्या किंवा बनवून घ्यायच्या विचारात आहात? आधी हे पाहा...   

सायली पाटील | Updated: Sep 18, 2024, 11:39 AM IST
सणासुदीच्या दिवसांपूर्वीच सोन्याच्या दरांना झळाळी; आज 22kt, 24kt ची किंमत काय? title=
Gold Price Today 18th September Gold and Silver rate latest update

Gold silver Price Today, 18th September 2024 : गणेशोत्सव नुकताच पार पडला असून, त्यामागोमागच आता नवरात्र आणि त्यानंतर लगेचच दिवाशी अशी सणवारांची रांगच लागली आहे. त्यातच अधूनमधून येणारं एखादं शुभकार्य म्हटलं की काही कार्यक्रमप्रसंगी, सोन्याचांदीच्या दागिन्यांचा उल्लेख होतो. 

अनेकदा हे दागिने खरेदी करण्यासाठी पैशांची तयारीसुद्धा केली जाते. पण, आता मात्र ऐन सणावारांच्या आधीच सोन्याच्या दरांनी ते खरेदी करावं की नाही, अशाच बुचकळ्यात अनेकांना पाडलं आहे. कारण, नेहमीचच.... सोन्याचे दर! कमोडिटी बाजारात सातत्यानं चढ- उतार पाहायला मिळत असून, पुन्हा एकदा या मौल्यवान धातूंचे दर वाढण्यास सुरूवात झाली असून, वायदा बाजारात बुधवारपासून या किमती वाढण्यास सुरुवात झाली. 

आज (बुधवारी) सोन्याचे दर 131 रुपयांनी वाढले असून, आता एकूण किंमत 73225 रुपयांवर पोहोचले आहेत. मंगळवारी हाच आकडा 73904 रुपयांवर थांबला होता. यादरम्यान चांदीमध्ये 363 रुपयांनी वाढ होऊन एकूण किंमत प्रति किलोग्राम 88777 रुपयांवर पोहोचली. मंगळवारी हेच दर 89140 रुपयांवर पोहोचले होते. 

हेसुद्धा वाचा : CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'

 

IBJA वर सोन्या- चांदीचे दर काय? 

विविध कॅरेटमध्ये सोन्याचे दर किती असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचंही उत्तर पाहून घ्या. (India Bullion And Jewellers Associaton Ltd.) आयबीजेएच्या माहितीनुसार हे दर खालीलप्रमाणं.... 

- Fine Gold (999)- 7,328 रुपये 
- 22 KT- 7,152
- 20 KT- 6,522
- 18 KT- 5,935
- 14 KT- 4,726

चांदी- (999)- 87,537 रुपये (प्रतिकिलो)

(दर प्रतिग्रामनुसार असून, त्यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज जोडण्यात आलेला नाही.)