सोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर

तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 21, 2017, 06:30 PM IST
सोन्याच्या दरात घसरण, पाहा किती आहे प्रति तोळा दर title=
File Photo

नवी दिल्ली : तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात आहात तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या किमतीत घट झाली आहे.

सराफा व्यापाऱ्यांची मागणी वाढत असतानाही सोन्याच्या किमतीत घट झाल्याचं पहायला मिळत आहे. दिल्लीतील सराफ बाजारात आज सोन्याच्या किंमतीत २५० रुपये प्रति ग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत ३०,५०० रुपये तोळा एवढी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत तीन आठवड्यांमधील सर्वात जास्त घट झाली आहे. इतकेच नाही तर चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचं पहायला मिळत आहे.

बाजारातील तज्ञांच्या मते, जगभरातील इतर प्रमुख मुद्रांच्या तुलनेत डॉलरची मजबूत स्थिती आणि फेडरल रिझर्व्हद्वारा व्याज दरात वाढ करण्याची घोषणेमुळे धातूवर परिणाम झाला आहे.