नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सोने सावरताना दिसतेय. दीर्घ काळाचा विचार केला तर, सोन्याच्या गुंतवणूकीत सकारात्मकता असल्याचे दिसून येत आहे. चांदीत देखील आता खरेदी वाढत आहे. इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढल्याने चांदीच्या गुंतवणूकीतही गुंतवणूकदार सकारात्मक आहेत.
सोन्यात गुंतवणूक
काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतींमध्ये सुस्ती होती. त्यानंतर आता चौफेर खरेदी दिसून येत आहे. 1 महिन्यात कॉमेक्सवर दर 6.5 टक्क्यांच्या खाली घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही हळु हळु सोन्याच्या दरांमध्ये तेजी येण्याचे संकेत असल्याने, गुंतवणूकदार कामाला लागले आहेत.
चांदीत गुंतवणूक
सोन्यासोबतच चांदीमध्ये खालच्या लेवलवर खरेदी होत असल्याचे दिसून आले आहे. कॉमेक्सवर चांदी 1 महिन्यात साधारण 6 टक्के घसरली आहे. त्यामुळे चांदीच्या गुंतवणूकीतही गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे.