सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Gold Import Duty : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोनं आजपासून (1 जुलै) सोनं प्रचंड महागलंय. 

Updated: Jul 1, 2022, 07:29 PM IST
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी title=

मुंबई :  सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सोनं आजपासून (1 जुलै) सोनं प्रचंड महागलंय. केंद्र सरकारनं सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्क्यांची घरघशीत वाढ केली आहे. त्यामुळे आता आयातशुल्क 15 पूर्णांक 75 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर उपकर, जीएसटी मिळून कर 18 पूर्णांक 75 टक्क्यांवर जातोय.  (gold import duty increased by 5 percent government issued notification)

आयात शुल्कात 5 टक्क्यांची घरघशीत वाढ

सोन्यावरील आयात शुल्क 10.75% वरून 15.75% पर्यंत वाढले आहे. सोन्यावर आयात शुल्क आणि जीएसटीसह एकूण 18.75% कर भरावा लागेल. आयात शुल्क वाढवल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसण्याची शक्यता आहे. वाढलेला कर आणि वाढत्या मागणीमुळे वायदा आणि रिटेल बाजारात सोनं तब्बल अडीच हजारांनी महागण्याची शक्यता आहे. मात्र यामुळे सोनं तस्करी बोकाळेल अशी भीती व्यापारी व्यक्त करतायत. 

मुंबईतील आजचे सोन्याचे दर (Gold Silver Price Today)

सोने 24 कॅरेट  52,200 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी : 59,000 रुपये प्रति किलो