विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल ४ किलो सोनं जप्त

विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल चार किलो सोनं सापडलं आहे. या सोन्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 21, 2017, 10:08 PM IST
विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल ४ किलो सोनं जप्त title=
Representative Image

चेन्नई : विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल चार किलो सोनं सापडलं आहे. या सोन्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

शौचालयात लपवलं होतं सोनं

दुबईहून चेन्नईला आलेल्या विमानातील शौचालयात हे सोनं लपवून ठेवण्यात आलं होतं. गुप्त माहितीच्या आधारे चेन्नई विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई

दुबईहून आलेल्या विमानातील मागील टॉयलेटमध्ये हे सोनं लपविण्यात आलं होतं. विमानतळावरील सर्वात मोठ्या कारवाईपैकी ही कारवाई असल्याचं सांगितलं जातयं.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनंतर विमानात तपासणी करण्यात आली. यावेळी शौचालयामध्ये एका पिशवित दोन काळ्या रंगाचे पाऊच आढळून आले. यामध्ये सोनं असल्याचं समोर आलं.

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत कोटींच्या घरात

जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत तब्बल १.१५ कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे. विमानात संपूर्ण तपासणी केल्यानंतर विमानाला दिल्लीसाठी रवाना करण्यात आलं.