सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 21, 2017, 09:49 PM IST
सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर title=
Representative Image

नवी दिल्ली : सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

सोन्याच्या दरात वाढ

गुरुवारी सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा १० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता सोनं प्रति तोळा २९,७००० रुपयांवर पोहोचलं आहे.

चांदीचा दरही वाढला

शिक्का निर्मात्यांकडून होणारी मागणी वाढल्याने चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात १०५ रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचा दर ३८,२८० रुपयांवर पोहोचला आहे. हा दर दोन आठवड्यांमधील सर्वाधिक आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात ०.१६ टक्क्यांची वाढ होत ते १,२६७.१० डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेलं सोन्याच्या दरात १०-१० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात क्रमश: २९,७०० रुपये आणि २९,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.