Gold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर

Gold and Sliver Price Today: आज महाराष्ट्र दिनाच्या मंगलमुहूर्तावर सोन्याच्या दरातही वाढ नाही. त्यामुळे आज सोन्याच्या (Gold Rates Today) खरेदीसाठी ग्राहकांकडे सुवर्णसंधी आहे. तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी जर का सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर जाणून घ्या आजचे दर काय सांगतात.

गायत्री हसबनीस | Updated: May 1, 2023, 11:08 AM IST
Gold Sliver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी अपडेट; ग्राहकांसाठी खुशखबर title=

Gold and Sliver Price Today: मार्च एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठी घट पाहायला (24 Carat Gold Price) मिळते आहे. परंतु कालच्या सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सोन्याचे दर आज म्हणजे 1 मे 2023 रोजी स्थिरस्थावर आहेत. तेव्हा ग्राहकांसाठी खरेदीची ही सुवर्णसंधी आहे. आज सोन्याचे दर हे 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे 60 हजार 930 रूपये प्रतितोळा आहेत. तेव्हा कालच्या एवढीचं ही रक्कम आहे त्यामुळे महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. तुम्ही जर आज महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din 2023) निमित्तानं सुट्टीच्या दिवशी सोनं खरेदी करायला बाहेर पडणार असाल तर आधी सोन्याचे दर किती हे जाणून घेतल्याशिवाय घराबाहेर पडूच नका. 

गुडरिटर्न्सप्रमाणे, आज सोन्याच्या दरात वाढही नाही आणि घसरणही नाही. 24 कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याच्या दरात आज बदल नाहीत. 1 ग्रॅम शुद्ध सोनं हे 6 हजार 93 रूपये तर 8 ग्रॅम सोनं हे 48,744 रूपये आहे. तर 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 60, 930 रूपये आहेत. 100 ग्रॅम सोनं हे 6,09,300 रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण पाहायला मिळते आहे. 22 कॅरेट सोनं हे आज 5,585 रूपये प्रति 1 ग्रॅम, 44,880 रूपये प्रति 8 ग्रॅम, 55,850 रूपये प्रति 10 ग्रॅम तर 5,58,500 रूपये प्रति 100 ग्रॅम इतके आहेत. (gold and sliver price today on maharashtra day check the latest prices in your city)

तुमच्या शहरातील दर नक्की किती? 

पुण्यात सोन्याचे दर हे घटले आहेत. आज शुद्ध सोनं पुण्यात 60,760 रूपये प्रति तोळा आहे. दिल्लीला 22 कॅरेट सोन्याचे दर हे 55,850 रूपये प्रति तोळा इतके आहेत. कोलकाता येथे 22 कॅरेट सोनं हे 55,700 रूपये प्रति तोळा असून हैद्राबाद येथे 22 कॅरेट सोनं हे 55,700 रूपये प्रति तोळा आहे. 

हेही वाचा - नेटकरी म्हणाले, 'जिंगा ला ला हू!' अतरंगी पोशाख परिधान केल्यामुळे Jacqueline Fernandez ट्रोल...

नागपूर येथे 24 कॅरेट सोनं हे 60,760 रूपये प्रति तोळा आहे. नाशिक येथे 24 कॅरेट सोनं हे 60,790 रूपये इतके आहेत. अमरावती येथे शुद्ध सोनं हे 60,760 रूपये प्रति तोळा इतके आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. त्यातून लग्नसराईचा मोहोल या मे महिन्यात असल्यानं ग्राहकांची सराफा बाजारातही मोठी चंगल पाहायला मिळते आहे.