नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी

सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.  

Updated: Jan 4, 2021, 06:05 PM IST
नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी title=

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार होत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहत आहे. नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचा दर 51 हजारांपलिकडे गेलेला पाहायला मिळाला. तर चांदीचा दर 70 हजारांपलिकडे पोहोचला आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या मनात संभ्रम कायम आहे.  
 
एचडीएफसीच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोमवारी 10 ग्राम सोन्यावर 877 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आज सोने खरेदीसाठी तब्बल 50 हजार 619 रूपये मोजावे लागत आहेत. तर मागील बाजारात सोन्याचे दर 49 हजार 742 रूपये ऐवढे होते.

सोन्यासोबतच चांदीचे भाव देखील वधारले आहेत. प्रति किलोमागे चांदीच्या दरांत 2 हजार 12 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज बाजारात चांदीचा दर 69 हजार 442 रूपये आहे. त्यामुळे सोने आणि चांदीची खरेदी करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे.

तर दुसरीकडे नव्या वर्षातल्या व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये तेजी तसंच विक्रमी क्लोजिंग पाहायला मिळाली. सेन्सेक्स सलग 9व्या दिवशी तेजीत बंद झाल्याचं पाहायला मिळालं.
सेन्सेक्स पहिल्यांदाच 48 हजारापार बंद झाला. निफ्टी प्रथमच 14 हजारापलिकडे बंद झाला आहे.