Gold and Silver Rate today : सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ

जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Updated: Aug 10, 2021, 12:00 PM IST
Gold and Silver Rate today : सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ  title=

मुंबई : सोन्याचे भाव गेल्या काही काळापासून एका ठराविक किंमतींच्या रेंजमध्ये फिरत आहेत. 10 ग्रॅमची सोन्याची किंमत 47 हजार ते 48 हजारांच्या आसपास आहे. पण दोन दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार 700 रूपयांची घट झाली असून चांदीचे दर 4 हजार रूपयांनी घसरले आहेत. पण आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. सोन्याचे दर सतत वाढत असले तरी सोने आणि चांदीची मागणी दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 

मंगळवारी सोन्याचे दर 185 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आज 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी 46 हजार 71 रूपये मोजावे लागत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याची किंमत 1,730.47 डॉलर प्रति औंस होती. अशी माहिती एमसीएक्सने दिली आहे. 

मंगळवारी, एमसीएक्सवर चांदीची किंमत 525 रुपयांनी वाढून 63,162 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 23.43 डॉलर प्रति औंस होती. महत्त्वाचं म्हणजे दिवाळीपर्यंत सोने 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, स्पेनचा Quadriga Igneo fund सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला (Diego parrilla) यांच्या एक अंदाजाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x