Gold Silver Price on 10th April 2023 : जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारात दिसून आला. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. तर चांदीचे दर स्थिर पाहायला मिळत आहे.
गुड्स रिटर्नच्या वेबसाईटनुसार आज 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 55,790 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 60,860 रुपये मोजावे लागतील. प्रति दहा ग्रॅम यावेळी सोने 61360 पेक्षा 500 रुपयांनी स्वस्त होत आहे. दरम्यान आज चांदीचा भाव 76,600 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. त्याची किंमत अंदाजे 76600 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्याच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर 900 रुपयांनी वाढले. तर गेल्या बुधवारी सोन्याच्या किमतीने आतापर्यंत रेकॉर्ड मोडला होता. त्यादिवशी सोन्याचे तोळ्याचे दर 61 हजार रुपयांवर गेला होता. सोन्यात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोला 63 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार आज 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी 76,600 रुपये मोजावे लागतील. चांदी सध्या 2 वर्षांच्या उच्चांकावर विकली जात आहे. यावेळी चांदी त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 3,247 रुपयांनी स्वस्त होत आहे.
आज भांडवली सराफा बाजारात तसेच देशांतर्गत वायदे बाजारात कोणताही बदल झालेला नाही. एमसीएक्सवर सोने एप्रिल वायदा 341 रुपयांच्या कमजोरीसह 60,515 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसत आहे. त्याचवेळी चांदीचा मे फ्युचर्स 25 रुपयांनी घसरून 74, 555 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.