Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Gold - Silver Rate : कोरोना काळात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात चढ-उतार सातत्याने दिसून येत आहेत. आज सोने - चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे. (Gold jewelery prices)

Updated: Feb 2, 2022, 09:58 AM IST
Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव title=

मुंबई : Gold - Silver Rate : कोरोना काळात सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मात्र, लॉकडाऊन उठल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोने दरात चढ-उतार सातत्याने दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी सोने दरात वाढ दिसून आली. परंतु आज सोने - चांदी दरात घसरण पाहायला मिळत आहे. (Gold jewelery prices)

आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. याचा परिणाम हा सराफा व्यवसायावर दिसून येत आहे. आंतराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किंमती तसेच रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत आहे. असे असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 44,900 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 44,900  रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. Good Returns websiteनुसार चांदी  62,000 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 

आजचा सोने दर किती?

Good Returns websiteनुसार मुंबईमध्ये  कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,900 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोने किंमत 48980 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44850असेल तर 24 कॅरेट सोने दर 48980 रुपये तर नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने दर 44850तर 24 कॅरेट सोने दर 48980 रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 620 रुपये आहे.

हॉलमार्क केलेले सोने

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर 22 आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. मात्र, हॉलमार्क सोने खरेदीसाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोने खरेदीसाठीचा असतो, हे प्रत्येक ग्राहकांना लक्षात ठेवले पाहिजे. तसेच दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमतीत देशात बदल दिसून येत आहे. 

असे ओळखा शुद्ध सोने

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोनेपासून दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये  91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहीत हवे. 22 कॅरेट सोन्यामध्ये दोन कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.