सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त

सोने- चांदीचे दर घसरले

Updated: Feb 12, 2019, 06:00 PM IST
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झाल्याने सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीत मंगळवारी सोनं 145 रुपयांनी स्वस्त झालं. आजचा सोन्याचा भाव 34,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळाली. सोमवारी सोनं 55 रुपयांनी स्वस्त झालं होतं. दुसरीकडे चांदी देखील 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

डॉलर मजबूत झाला असला तरी सोन्य़ाची मागणी कमी राहिल्याने सोनं स्वस्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं 0.01 टक्के स्वस्त झालं. न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,308.70 डॉलर प्रति औंस झालं आहे. तर चांदी 0.13 टक्क्याने कमी होऊन 15.80 डॉलर प्रति औंस झाली आहे.

दिल्ली सर्राफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 145-145 रुपयांनी स्वस्त झालं असून ते अनुक्रमे 34,080 रुपये आणि 33,930 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं आहे. सोमवारी सोनं 55 रुपयांनी स्वस्त झालं होतं. चांदी 100 रुपयांनी स्वस्त होत 41,000 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे.