अवघ्या ३१२ रूपयांमध्ये 'गो एअर' सोबत करा विमानप्रवास

सुट्ट्यांच्या काळ सुरू होतोय. अवघ्या दीड महिन्यात २०१८ सुरू होईल. मग नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅन बनवत असाल तर 'गो एअर' ची खास ऑफर तुमच्यासाठी आहे.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 25, 2017, 09:03 AM IST
अवघ्या ३१२ रूपयांमध्ये 'गो एअर' सोबत करा विमानप्रवास  title=

मुंबई : सुट्ट्यांच्या काळ सुरू होतोय. अवघ्या दीड महिन्यात २०१८ सुरू होईल. मग नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅन बनवत असाल तर 'गो एअर' ची खास ऑफर तुमच्यासाठी आहे.

'गो एअर' ने शुक्रवारी लिमिटेड पिरेड साठी एक खास ऑफर घोषित केली आहे. यानुसार  अवघ्या ३१२ रूपयांमध्ये विमानाचा वन वे प्रवास करणं शक्य होणार आहे. 

कोणत्या शहरांसाठी असेल ही ऑफर ? 

दिल्ली, कोची, बंगळूरू,हैदराबाद,चैन्नई,अहमदाबाद, लखनऊ अशा सात शहरांसाठी उपलब्ध आहे. मात्र या ऑफरमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रथम येणार्‍यास प्राधान्य यानुसार प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहेत. 

कधी करू शकाल प्रवास ? 

गो एअरची ही ऑफर १ डिसेंबर ते २८ ऑक्टोबर २०१८ या दिवसांदरम्यान प्रवास करणार्‍यांसाठी उपलब्ध होणार आहे. तर या तिकिटांची बुकिंग २९ नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहेत. 

गो एअरने घोषित केलेल्या विमानाच्या तिकीटाच्या दरामध्ये टॅक्सचा समावेश नाही.