गोवा निवडणूक : राहुल गांधी करणार या दिवशी दौरा

Rahul Gandhi to visit Goa : पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) राज्याचा दौरा करणार आहेत.  

Updated: Oct 28, 2021, 08:59 AM IST
गोवा निवडणूक : राहुल गांधी करणार या दिवशी दौरा title=
संग्रहित छाया

पणजी : Rahul Gandhi to visit Goa : पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 30 ऑक्टोबर रोजी राज्याचा दौरा करणार आहेत. काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना राहुल गांधी गोवा दौऱ्यावर (Rahul Gandhi to visit Goa on October 30 as Congress gears up for Assembly polls 2022) असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी 30 ऑक्टोबर रोजी राज्याचा दौरा करणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या भेटीची माहिती दिली.

गोवा विधानसभेत 40 सदस्य संख्या असून त्यापैकी भाजपकडे सध्या 17 आमदार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP), गोवा फॉरवर्ड पार्टीचे (GFP) विजय सरदेसाई आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे.

GFP आणि MGP चे प्रत्येकी तीन आमदार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे 15 आमदार आहेत. दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपपेक्षा चांगले यश मिळवले होते. मात्र, भाजपने काँग्रेसचे काही आमदार गळाला लावत गोव्यात भाजपची सत्ता स्थापन केली.