होळीच्या विकेंडला ट्रेनपेक्षा स्वस्त दरात विमानाची तिकिटं

यंदा होळीचा सण विकेंडला जोडून आल्याने तुम्ही एखादी लहानशी ट्रिप नक्की प्लॅन करू शकता. या लॉंग विकेंडचं प्लॅनिंग करणार असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. काही एअरलाईन्स कंपनीने होळीचा फेस्टीव्ह सीझन एनकॅश करण्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. 

Updated: Feb 22, 2018, 08:18 PM IST
होळीच्या विकेंडला ट्रेनपेक्षा स्वस्त दरात विमानाची तिकिटं  title=

मुंबई : यंदा होळीचा सण विकेंडला जोडून आल्याने तुम्ही एखादी लहानशी ट्रिप नक्की प्लॅन करू शकता. या लॉंग विकेंडचं प्लॅनिंग करणार असाल तर तुमच्यासाठी खूषखबर आहे. काही एअरलाईन्स कंपनीने होळीचा फेस्टीव्ह सीझन एनकॅश करण्यासाठी खास ऑफर आणल्या आहेत. 

अनेक कंपन्यांच्या खास ऑफर 

विमानप्रवास स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी गो एयर, एयर एशिया आणि जेट एयरवेज या विमानकंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. गो एअरची विमान तिकीटं 991 रूपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. तर एअर आशिया प्रमोशनल स्किममध्ये 20% सूट देणार आहेत.  

991 रूपयात विमानप्रवास 

जेट एअरवेज अनेक विमानप्रवासाच्या मार्गांवर वेगवेगळी डिस्काऊंट ऑफर देणार आहे. गो एअर कडून ' होली स्पेशल विकेंडची' स्कीम आणणार आहेत. त्यानुसार काही मार्गांवर अवघ्या 991 रूपयांमध्ये विमान तिकीट उपलब्ध करून देणार आहे. सोबतच एचडीएफसी कार्डच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास 10% अधिक सूट मिळणार आहे. 

गो एअरच्या विमानप्रवासाचे तिकीटदर  

बागडोगरा - गुवाहाटी-  991 रुपये
चेन्नई - कोच्च‍ि---1120 रुपयांपासून सुरूवात 
गुवाहाटी - बागडोगरा---1,291 रुपयांपासून सुरूवात 
बेंगलुरु - कोच्च‍ि---1,390रुपयांपासून सुरूवात 
कोच्च‍ि - बेंगलुरु---1,390 रुपयांपासून सुरूवात 

एअर एशियाची ऑफर  

होळीच्या निमित्ताने एअर एशियाने 20% सूट देण्याची घोषणा केली आहे. सोबतच इंटरनॅशनल फ्लाईटवरही सूट देण्यात आली आहे. एअर एशियाची ऑफर 20-25 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे. 
एअर एशिया बेंगळूरू, नवी दिल्ली, चेन्नई, विशाखापटनम या मार्गांवर खास सूट देणार आहे. या दिवसात 26 फेब्रुवारी ते 30 जुलै 2018 दरम्यान प्रवास  करता येणार आहे.  

जेट एअरवेज 

जेट एअरवेज डोमेस्टिक विमानसेवेसाठी 20 % सूट देणार आहे. ही ऑफर डोमेस्टिक फ्लाईटमध्ये प्रीमियम आणि इकॉनॉमी क्लाससाठी खुली राहणार आहे. 24 फेब्रुवारी ते 24 मार्च दरम्यान प्रवास करता येणार आहे.