ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा, या तरुणीसोबत जे घडलं, पाहून तुमच्या हृदयाचा चुकेल ठोका

 सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात.

Updated: Jun 20, 2022, 08:10 PM IST
ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी हा व्हिडीओ पाहा, या तरुणीसोबत जे घडलं, पाहून तुमच्या हृदयाचा चुकेल ठोका title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला बरंच काही शिकवून जातात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. जो आपल्या सर्वांसाठी आणि त्या मुलीसाठी देखील एक धडा आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी ट्रेनच्या डब्याच्या दरवाजाजवळ उभी राहून  फिल्मी स्टाईलमध्ये हवेचा आनंद लुटत असते. परंतु त्यानंतर तिच्यासोबत जे घडतं ते पाहून काही क्षणासाठी का होईना तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल.

खरंतर ट्रेनच्या दरवाज्यावर एखाद्या फिल्मी स्टाईलची कॉपी करत असलेल्या या मुलीचा अचानक पाय घसतो आणि ती खाली पडते. खरंतर ही मुलगी जेव्हा खाली पडते, त्याच सेकंदाला तिच्यासमोरुन दुसरी ट्रेन जाते. ज्यामुळे अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला.

या मुलेचा जीव आता काही वाचत नाही असं, काही सेकंदासाठी आपल्या मनात येतं, परंतु पुढच्याच क्षणी तुम्हाला लक्षात येईल की, ती तरुणी ट्रेनला लटकलेली दिसत आहे. ही तरुणी दोन ट्रेनच्या मधोमध लटकत होती.

https://fb.watch/dM9PiVhj8h/

खरंतर या तरुणीचं नशीब चांगलं होतं की, तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी तिचा हात धरुन ठेवला होता, ज्यामुळे तिचे प्राण वाचले. नंतर लोकांनी या तरुणीला वर खेचलं आणि पुन्हा ट्रेनच्या आत खेचलं.

खरंतर असे काही लोक आहेत, जे ट्रेनमध्ये असा निष्काळजीपणा करतात, ज्यामुळे त्यांच्यावर अशी वेळ येते. तर काही लोक हे मजेदारपणे असं करतात, ज्याची शिक्षा त्यांना कधीना कधी मिळतेच.

हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असल्याचे समोर आले आहे. परंतु तो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.

हा व्हिडीओ पाहून सावध व्हा आणि तुमच्या आजूबाजूला कोणी असा मूर्खपणा करत असेल, तर त्यांना देखील सावध करा.