मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झालेय. मात्र, त्यांचा पत्रकार, कवी ते पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. तब्बल चार दशके ते राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले. त्यांनी तीन वेळा पंतप्रधानपद भूषविले होते. त्यांचे व्यक्तीमत्व प्रभावी होती. अटलजी सर्वसामान्य कार्यकर्ता, अगदी वाहन चालकाचे आभार मानायलाही वाजपेयीजी विसरत नसत. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचार सरणी अनेकांना भूरळ घातल असे.
अटलबिहारी वाजपेयी म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. राजकारणीतल ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. तर काहींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अखेर माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. अटलजींच्या आठवणींना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी उजाळा दिलाय. सर्वसामान्य कार्यकर्ता, अगदी वाहनचालकाचे आभार मानायलाही वाजपेयीजी विसरत नसत ही आठवण मनावर कोरली गेल्याचे बापट म्हणाले.
पुण्यात आले की अटलजी श्रेयस हॉटेलमध्ये उतरायचे. त्यांना कांदेपोहे खूप आवडायचे. श्रेयस हॉटेलच्या चितळे परिवाराशी त्यांचे कौटुंबीक ऋणानुबंध होते. अटलजींच्या खानपानापासून ते वागण्याबोलण्यापर्यंत विविध आठवणी त्यांच्याकडे आहे. गाडी चालवणारा ड्रायव्हर आपल्यासाठी तसा साधाच. पण अटल बिहारी वाजपेयींसाठी मात्र गाडीचा ड्रायव्हर हा चक्रधरजी होता. आणि त्याचेही आभार मानायला ते विसरत नसत. वाजपेयींची ही आठवण सांगितलीय पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या साधेपणाचा आणि माणुसकीचा प्रत्यय देणारा हा अनुभव. मागील तीस - चाळीस वर्षांत बापट यांचा वाजपेयी यांच्याबरोबर अनेकदा संपर्क आला. मात्र, ड्रायव्हर विषयीचे हे क्षण त्यांच्या मनात कायमचे कोरले गेले आहेत, असे बापट म्हणालेत.