घाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर

घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये. 

Updated: Jul 31, 2017, 01:06 PM IST
घाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर  title=

नवी दिल्ली : घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये. 

इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आलीये.

गेल्या आठवड्यात मंगळवारी घाटकोपर येथील दामोदर पार्क येथे साईसिद्धी ही चार मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत १८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी आरोपी सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336,338,283/17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.