Quiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?

General Knowledge Quiz : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा असतो. यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत. 

Updated: Sep 7, 2024, 07:30 PM IST
Quiz: एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं? title=

General Knowledge Quiz : सध्याच्या धकाधकीच्या आयु्ष्यात प्रत्येकजण घड्याळ्याच्या काट्यावर चालतोय. नऊ तास नोकरी, तीन ते चार प्रवास यातून माणूस पुरता थकून जातो. त्यामुळे जीवनात थोडासा विरंगुळाही गरजेचा आहे. मोठ्यांना कामातून तर छोट्यांना अभ्यासातून वेळच मिळत नाही. कामाच्या आणि अभ्यासाच्या ताणामुळे काही वेगळा विचार करण्याची संधी फारच कमी मिळते. हेच लक्षात घेऊन तुमचा ताण थोडा का होईना कमी करण्यासाठी आम्ही एक प्रश्नमंजुषा घेऊन आलोय. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर पण तितकीच विचार करायला लावणारी आहेत.

सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. शर्यतीत पुढे राहाण्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकण्याची गरज आहे. यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) हे खूप महत्त्वाचं आहे.

आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न विचारणार आहोत, जे कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले किंवा वाचले नसतील. आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, ती प्रश्न वाचून त्याची उत्तर तुम्हाला येतात का याचा आधी विचार करा, तुमच्या माहितीसाठी या प्रश्नांच्या खाली उत्तरंही देण्यात आली आहेत.

प्रश्न - जगात सर्वात नावडती भाजी कोणती आहे?

उत्तर - जगात सर्वांची नावडती भाजी कारलं ही आहे.

प्रश्न -  मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला किती रुपये बक्षीस मिळतं?

उत्तर -  मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला जवळपास 10 कोटी रुपयांच बक्षीस दिलं जातं.

प्रश्न -  कोणत्या देशातील लोकं सापाचं विष पितात?

उत्तर -  असं सांगितलं जातं की इंडोनेशिया (Indonesia) देशातील लोकं सापाचं विष पितात.

प्रश्न -  असं कोणतं काम आहे जे माणूस मृत्यूनंतरही करतो?

उत्तर -  मृत्यूनंतर माणूस अंगदान करु शकतो.

प्रश्न -  असा कोणता रुम आहे ज्याला भिंत नाही?

उत्तर -  मशरूम

प्रश्न -   दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो?

उत्तर -   आरोग्य तज्ज्ञांच्या मते दूधाबरोबर उडीद डाळ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो.

प्रश्न -  एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?

उत्तर - वास्तविक त्या मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला. वीस वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. ती रुग्णालयाच्या ज्या वॉर्डमध्ये दाखल होती त्या वॉर्डचा नंबर होता 1990