जाणून घ्या भारत- चीनच्या सैन्यांत चकमक झालेल्या गलवान खोऱ्याविषयी

चर्चांतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत असताना मात्र खुद्द सीमेवर मात्र परिस्थिती वेगळीच   

Updated: Jun 16, 2020, 02:58 PM IST
जाणून घ्या भारत- चीनच्या सैन्यांत चकमक झालेल्या गलवान खोऱ्याविषयी  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : काही दिवसांपासून Galwan Valley गलवान नदी, गलवान खोरं किंवा गलवान व्हॅली असे शब्द वारंवार कानांवर पडत आहेत. India भारत आणि China चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये सीमारेषेवरुन सुरु असणारा एकंदर वाद पाहता या ठिकाणाला महत्त्वं देण्यात येत आहे. दोन्ही देशांकडून या मुद्द्यावर परस्पर सामंजस्यानं, चर्चांतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत असताना मात्र खुद्द सीमेवर मात्र परिस्थिती काही वेगळंच सांगत आहे. 
जवळपास १९६२ नंतर पहिल्यांदाच या भागात ही तणावाची परिस्थिती उदभवली आहे. दोन्ही देशांनी एलएसीचा स्वीकार केल्यानंतरही उदभवलेली ही परिस्थिती वातावरण आणखी तणावपूर्ण करत आहे. 

१९६२ मध्ये नेमकं काय घडलं होतं? 

या वर्षी चीनकडून भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून हल्ला करण्यात आला होता. Xinjiang आणि तिबेट येथे बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या मुद्द्यावरुन हा संघर्षाचा घटका उडाला होता. आजमितीस हा रस्ता G219 म्हणून ओळखला जातो. भारतीय हद्दीत येणाऱ्या असकाई चीन प्रांतातून हा जवळपास १७९ किलोमीटरचा रस्ता जातो. ज्याची बांधणी करण्यासाठी भारताकडून रितसर परवानगी न घेता चीनकडून पुढं या भागांवर दावा सांगण्यात आला. 

Xinjiang आणि तिबेट महामार्गापासून भारताला शक्य तितकं दूर ठेवण्याकडे चीनचा भर होता. ज्यासाठी त्यांनी बहुतांश भागावर दावा सांगण्यास सुरुवात केली. सहसा डोंगररांगांमध्ये असणारे पास हे त्यासभोवतालच्या भागांमध्ये असणं अपेक्षित असतं. पण, भारताकडून पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत अशी कोणतीही हालचाल केली जाऊ नये यासाठी चीनच्या हालचाली सुरु होत्या. 

भारताकडूनच सीमोल्लंघन; चीनचा उलट आरोप

गलवान नदीविषयी सांगावं तर, सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या या राईडलाईनजवळून जाणाऱ्या श्योक रुट पासमुळं वर्चस्वाची चीनकडे जास्त संधी. चीननं या संपूर्ण भागावर वर्चस्व दाखवलं नाही, तरी भारताकडून या नदीच्या खोऱ्याचा वापर अस्काई चीन प्रांताच्या विस्तारासाठी करुन चीनला धडकी भरवू शकतो. 

रिव्हर ऑफ डेथ 

बऱ्याच वर्षांपूर्वी सध्याच्या घडीला चीनमध्ये असणाऱ्या xinjiang प्रांतात असणाऱ्या भागातून अनेक कारवाँ (स्थानिक मेंढपाळ वगैरे) ये- जा करत असत. श्योक नदीपात्र गोठलेलं असताना ते त्यावरुन प्रवास करत असतं. लेहवरुन पुढं गेलेले कारवाँ लडाखमधील चांग ला पास ओलांडून दरबुकला पोहोचून त्यानंतर ते श्योक गावात पोहोचत. 

थंडीच्या दिवसांमध्ये गोठलेली ही नदी प्रवासासाठी वापरली गेली पण, उन्हाळा सुरु होताच त्यावर असणरी बर्फाची चादर वितळून त्याने नदीपात्राचं रुप घेण्यास सुरुवात केली. नदीचा प्रवाह इतका मोठा आणि प्रचंड होता की यामध्ये अनेक स्थानिक मेंढपाळ आणि प्राणी या पात्रात वाहून गेले. त्यामुळंच श्योक नदीला रिव्हर ऑफ डेथ असंही म्हणतात. 

 

सद्यस्थिती काय सांगते? 

भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमदील सद्यस्थिती पाहता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही राष्ट्रांमध्ये गलवान खोऱ्याच पहिल्यांदाच चकमक झाली. चीनच्या सैन्य तुकड्यांनी या भागात एलएसी ओलांडल्याचं म्हटलं गेलं.

व्हापासून परिस्थिती दिवसागणिक तणावपूर्ण होत गेली. गलवान खोऱ्याकडे DS-DBO road मुळं अतिशय संवेदनशील भाग म्हणून पाहिलं जातं. त्यातही दोन्ही सैन्यांचा वारंवार होणारा आमनासामना आणि चीनकडून होणारी घुसखोरी पाहता या भागातून सीमारेषा ओलांडण्याच्या घटनांमुळं एक मोठा प्रश्चच उभा राहिल्याचं स्पष्ट होत आहे.