पंतप्रधान निवासस्थानी मोदी-बायडेन भेट, पहिल्यांदा भारतात आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं जोरदार स्वागत

जी 20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती  बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले... भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

राजीव कासले | Updated: Sep 8, 2023, 09:33 PM IST
पंतप्रधान निवासस्थानी मोदी-बायडेन भेट, पहिल्यांदा भारतात आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं जोरदार स्वागत title=

G20 Summit 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यामध्ये आज पंतप्रधान निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा झाली. जी 20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) बायडेन यांचं आज भारतात आगमन झालंय. अमेरिकेच्या एअर फोर्स वन या विशेष विमानाने ते दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरले. भारताकडून यावेळी बायडेन यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जनरल व्ही.के. सिंह हे बायडेन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.. अत्याधुनिक अशा बिस्ट कारमधून बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी रवाना झाले. पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

बायडेन यांचा भव्य स्वागत
जी 20 शिखर परिषदेसाठी संध्याकाळी उशीार जो बायडेन भारतात आले. यावेळी विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी बायडनं यांचं स्वागत करण्यासाठी एक लहान मुलगीही विमानतळावर हजर होती. या मुलीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. या मुलीचं नाव माया असं असून ती भारतातले अमेरिकेचे राजूद एरिक गार्सेटी यांची मुलगी आहे. मायाने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना मिठी मारुन त्यांचं स्वागत केलं. 

पंतप्रधानांनी दिली माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडे, मॉरिशसचे पंतप्रधान प्राविंद कुमार जुगनाथ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेली बैठकीची माहिती दिली आहे. 8 ते 10 डिसेंबरदरम्यान भारतात जी 20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून पीएम मोदी जगभरातील नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. नवी दिल्ली येथे होणारी G20 शिखर परिषद मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवीन मार्ग तयार करेल असा विश्वास पीए मोदी यांनी व्यक्त केला आहे. 

जी 20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले जागतिक नेते दिल्लीत राजघाटवर महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पित करतील. सर्व देश 'वन अर्थ' वन फैमिली' दृष्टकोन ठेऊन काम करतील, असा विश्वास पीएम मोदींनी व्यक्त केला आहे.  

या नेत्यांबरोबर पीएम करणार चर्चा
9 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांशी द्विपक्षीय बैठक करतील. त्यानंतर 10 सप्टेंबरला फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांच्याबरोबर लंच मिटिंग करतील. त्यानंतर पीएम मोदी तुर्की, संयुक्त अरब अमीरात, दक्षिण कोरिया, ब्राझील, नायजेरिया या देशांच्या नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. याशिवाय कॅनाडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन टूडो यांच्याबरोबर एक बैठकही आयोजित करण्यात आली आहे. 

जी 20 शिखर परिषदेसाठी कडेकोट सुरक्षा
जी 20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतल्या प्रगती मैदानावर ही परिषद होत आहे.