पैसे वाचवण्यासाठी बहिणीने लावलेली शक्कलं....पण भावाच्या भेटी पुढे राखी पडली महागच... पाहा व्हिडीओ

रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ-बहिणीचा दिवस. प्रत्येक भाऊ बहिण कितीही एकमेंकासोबत भांडले, तरी या दिवशी मात्र ते एकत्र येतात.

Updated: Aug 22, 2021, 03:40 PM IST
पैसे वाचवण्यासाठी बहिणीने लावलेली शक्कलं....पण भावाच्या भेटी पुढे राखी पडली महागच... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : रक्षाबंधन हा प्रत्येक भाऊ-बहिणीचा दिवस. प्रत्येक भाऊ बहिण कितीही एकमेंकासोबत भांडले, तरी या दिवशी मात्र ते एकत्र येतात. या दिवसाची अशी प्रता असते की, बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याला ओवाळणी करुन काही तरी गोड खायला देते, त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीच्या ओवाळणीत तिला भेट, म्हणून पैसे किंवा काहीतरी वस्तू देतो.

भाऊ आणि बहिणीचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बहिणीने भावासमोर आपलं शहाणपण दाखवला खरा पण नंतर तो तिला महागात पडला.

या व्हिडिओमध्ये एक बहीण आपल्या भावाला राखी घेऊन येते. राखी बांधताना ती भावाला सांगते की, यावेळी बाजार बंद असल्यामुळे मी स्वतःच्या हातांनी बनवलेली म्हणजेच हॅन्डमेड राखी तुला बांधत आहे. असे बोलल्यानंतर ती भावाच्या हातात ती राखी बांधते.

भाऊंची अनोखी भेट

परंपरेप्रमाणे बहिणीने राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीच्या हातात आपल्या खिशातून काहीतर काढून ठेवतो. खरेतर हा भाऊ एका कागदाचा तुकड्या आपल्या बहिणाच्या हातात ठेवते. तो कागद पाहून हे नक्की काय आहे हे बहिणीला कळत नाही. म्हणून मग बहिण भावाला याबद्दल विचारते तेव्हा भाऊ तिला सांगतो की, यावेळी बँक बंद असल्यामुळे, मी स्वतःच्या हाताने कागदावर लिहून तुला भेट देत आहे. 

आपला प्लॅन आपल्यावरच उलटलेला पाहून बहिणीला खूप राग येतो. भावा बहिणीचं नातं हे असंच असते, त्यांच्या या भांडणातच त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आहे. कारण बहिण-भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांप्रतिचं त्यांचे प्रेम कधी कमी होत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

असे जरी ते भांडताना दिसले तरी, जेव्हा वेळ येते तेव्हा ते एकमेकांसोबत नेहमी उभे रहातात. या व्हिडीओला सोशल मीडियावर लोकांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच लोकं आपले आपल्या बहिणीसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहे.