...त्यांनी हायकोर्टाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं!

 स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश पाण्डेय यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आपली जीवन यात्रा संपवलीय

Updated: Oct 23, 2018, 04:25 PM IST
...त्यांनी हायकोर्टाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं! title=

लखनऊ : लखनऊ स्थित हायकोर्टाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीनं आपलं जीवन संवपलंय. मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश पाण्डेय यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आपली जीवन यात्रा संपवलीय. 

या धक्कादायक घटनेनंतर अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना लोहिया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं... इथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

काही दिवसांपूर्वीच रमेश पाण्डेय यांनी स्थायी समितीच्या काऊन्सिल पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्येत असल्याचं सांगण्यात येतंय.

घटनेनंतर वकिलांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा मोठ्या संख्येनं वकील हॉस्पीटल परिसरात जमा झाले. 

पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं दाखल होत घटनेची चौकशी सुरू केलीय. ही आत्महत्याच होती की कुणी त्यांना धक्का दिला, याबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे.