सीबीआयचे माजी डायरेक्टर अश्वनी कुमार यांची आत्महत्या

अश्वनी कुमार हे नागालँड आणि मणिपूरचे माजी राज्यपाल देखील होते. 

Updated: Oct 7, 2020, 09:43 PM IST
सीबीआयचे माजी डायरेक्टर अश्वनी कुमार यांची आत्महत्या title=

शिमला : सीबीआयचे माजी डायरेक्टर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. शिमला येथील ब्रॉकहॉर्स येथील घरात त्यांनी फाशी घेत आत्महत्या केली. अश्वनी कुमार सीबीआय चीफ होण्याआधी हिमाचल प्रदेश पोलीस डीजीपी देखील होते. 

अश्वनी कुमार हे नागालँडचे राज्यपाल देखील राहिले आहेत. तर काही दिवस ते मणिपूरचे राज्यपाल देखील होते. अश्वनी कुमार यांच्या आत्महत्ये मागचं कारण अजून पुढे आलेलं नाही. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.