मुंबई : उन्हाळ्याच्या तडाख्यापासून सुटका व्हावी यासाठी प्रत्येकजण पावसाची प्रतिक्षा करतेय. मात्र या घटनेत काही वेगळेच घडले आहे.आकाशातून पाऊस नाही तर मासे पडल्याची घटना घडलीय. हे मासे गोळा करण्यासाठी नागरीकांची झुंबड उडालीय. या संदर्भातला व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नेमके या व्हिडिओमागचं सत्य काय आहे ? ते जाणून घेऊयात...
व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत रस्त्यावर माशांचा पाऊस पडल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर मासे पडू लागणे हे ऐका चमत्कारापेक्षा कमी नाही आहे.अशा घटना याआधीही घडल्या आहेत. व्हिडिओत संपूर्ण रस्त्यावर माशांचा खच पडलेला दिसत आहे. हे मासे गोळा करण्यासाठी नागरीकांनी एकच गर्दी केली होती. ज्याला जे मिळाले ते भांडे घेऊन मासे गोळा करत होते. काही नागरीक बादली, गोणी, तर काही दुचाकीस्वार हेल्मेटमध्ये मासे भरताना दिसत आहेत. मासे गोळा करण्यासाठी नागरीकांची एकच झुंबड उडाली होती.
सड़क पर गिरी मछली, मच गई लूट#बिहार pic.twitter.com/ZleUZpDOp2
— Hari krishan (@ihari_krishan) May 28, 2022
व्हिडिओ मागचं सत्य काय ?
हा व्हिडिओ बिहारमधील गया जिल्ह्यातील अमास पोलीस स्टेशन परिसरातला आहे. व्हायरल व्हिडिओतील रस्त्यावर शनिवारी माशांनी भरलेला ट्रक पलटी झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, ट्रक मागे ठेवलेले मासे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खाली पडू लागले होते. हे मासे रस्त्यावर सर्व दुर पडलेले पाहून नागरीकांमध्ये माशांचा पाऊस पडल्याची चर्चा सुरु झाली. आणि इथूनच माशांचा पाऊस पडल्याची चर्चा सूरू झाली आणि व्हिडिओही व्हायरल झाला.