लेट फी माफी योजनेला अर्थमंत्रालयाकडून मुदतवाढ; आता या तारखेपर्यत अर्ज करण्याची मुभा

अर्थ मंत्रालयाने GST तर्फे लेट फी माफी योजनेचा लाभ घेण्याची अंतिम दिनांक वाढवून आता 30 नोव्हेंबर 2021 केली आहे

Updated: Aug 30, 2021, 07:51 AM IST
लेट फी माफी योजनेला अर्थमंत्रालयाकडून मुदतवाढ; आता या तारखेपर्यत अर्ज करण्याची मुभा title=

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने GST तर्फे लेट फी माफी योजनेचा लाभ घेण्याची अंतिम दिनांक वाढवून आता 30 नोव्हेंबर 2021 केली आहे. ही योजना 31 ऑगस्ट 2021 ला बंद होणार होती.

लेट फी माफी योजना जुलै 2017 पासून ते 2021 पर्यंत टॅक्स पिरियडसाठी फॉर्म GSTR-3B दाखल न करण्यावर लेट फीमध्ये कपात किंवा सूटशी संबधित आहे. याआधी सरकारने 1 जून ते 31 ऑगस्ट दरम्यान रिटर्न फाइल करण्याऱ्यांची जुलै 2017  ते एप्रिल 2021 च्या अवधीसाठी गैर प्रस्तुत FORM GSTR-3B वर लागणारी लेट फी मध्ये कपात केली आहे किंवा माफ केली आहे.

मंत्रालयने म्हटले आहे की, अनेक कारणांमुळे सरकारने नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळमर्यादेला 30 सप्टेंबर पर्यंत वाढवले आहे. नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च ते ऑगस्ट 2021 दरम्यानची आहे.

त्यासोबतच अर्थ मंत्रालयाने GSTR-1 दाखल करणे नोंदणी रद्द करणे आणि इलेक्ट्रॉनिक वेरिफिकेशन कोडचा उपयोग करण्यासाठी अर्ज करण्यासंबधीची वेळमर्यादा वाढवली आहे.

मंत्रालयाने म्हटले आहे की, लेट फी माफी योजनेची अंतिम तारीख वाढवणे आणि नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची वेळमर्यादा वाढवल्याने मोठ्या संख्येने छोट्या करदात्यांना लाभ होणार आहे. जे अनेक कारणांमुळे वेळेत आपला रिटर्न भरू शकलेले नाहीत.

Finance Ministry extended last date to avail benefit of the late fee amnesty scheme