खेकड्यावर गुन्हा दाखल करा; इसमाची पोलिसांकडे मागणी

खेकडा चावल्याची तक्रार घेऊन एका इसमाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे.

Updated: Aug 15, 2021, 01:50 PM IST
खेकड्यावर गुन्हा दाखल करा; इसमाची पोलिसांकडे मागणी title=

मुंबई : 'मला खेकडा चावला...त्याला जेलमध्ये टाका' अशी तक्रार घेऊन एका इसमाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे. एक मज्जा म्हणून पोलिसांनीही त्या इसमाला प्रश्न केला की, खेकड्याला कसं पकडावं? तर त्यावरही या व्यक्तीने दिलेली उत्तरं गंमतीशीर आहेत. खास ग्रामीण लहेजा असलेल्या या संवादांमुळे महाराष्ट्रभर नेटीझन्स या व्हिडीओचा आनंद लुटतायत. 

खेकड्याला जेलमध्ये टाका हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पहिल्यांदा या व्यक्तीची तक्रार ऐकून पोलिसंही चक्रावले होते. मात्र त्यांनी देखील या तक्रारीला गमतीत घेत त्यालाच प्रश्न केले आहेत.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये बसला असून तो म्हणतो की, खेकडा माझ्या हातापायला चावला तुम्ही त्याला पकडा आणि गुन्हा दाखल करत जेलमध्ये टाका. खेकड्याने का चावावं मला?

पोलिसांनीही हे प्रकरणं गमतीत घेत त्याला म्हटलं की, तुम्ही का खेकड्याला पकडायला गेलात. असं असेल तर खेडक्याने तुमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलं पाहिजे. मात्र तरीही तो व्यक्ती ऐकण्यास कबूल नव्हता.

खेडक्याला पकडून कुठे टाकायचं या पोलिसांच्या प्रश्नावर त्याने उत्तर देत म्हणलं, खेकड्यांना पकडा आणि कुठेही टाका...हवतंर जेलमध्ये टाका. आम्हाला जसं जेलमध्ये टाकता तसं त्या खेकड्यालाही टाका. शिवाय जर त्या खेकड्याने माझ्याविरोधात तक्रार दिली तर मलाही जेलमध्ये टाका, असंही त्याचं म्हणणं आहे. 

दरम्यान सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.