फायटर पायलट अवनी यांनी रचला आणखी इतिहास

 फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी वायूसेनेच्या जामनगरच्या तळावरून मिग 21 हे युद्धविमान एकटीनं उडवलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 22, 2018, 12:16 PM IST
फायटर पायलट अवनी यांनी रचला आणखी इतिहास title=

जामनगर : वायूसेनेत नुकत्याच दाखल झालेल्या फायटर पायलट फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदींनी पुन्हा एकदा इतिहास रचला. फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी वायूसेनेच्या जामनगरच्या तळावरून मिग 21 हे युद्धविमान एकटीनं उडवलं.

खडतर प्रशिक्षणाची गरज

हाताळायला अत्यंत कठीण मानलं जाणारं मिग 21 विमान उडवण्यासाठी खडतर प्रशिक्षणाची गरज असते. हे प्रशिक्षण पूर्ण करून अवनी चतुर्वेदी यांनी भारतीय महिलांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. 

आणखी तीन महिला फायटर पायटल

जुलै 2016 मध्ये अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तिघी नव्या दमाच्या फायटर पायलट भारतीय वायूसेनेत रुजू झाल्या. त्यानंतर वायूसेनेनं आणखी तीन महिला फायटर पायटल निवडल्या असून या तिघी सध्या बंगळूरूमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.