Fathers Day | भरपावसात मुलीच्या अभ्यासाठी बापाने धरली छत्री! व्हायरल फोटोने नेटकरीही सुखावले

सोशल मीडियावर दररोज काहीही व्हायरल होऊ शकतं. या दिवसांमध्ये सोशलमीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Updated: Jun 20, 2021, 07:49 PM IST
Fathers Day | भरपावसात मुलीच्या अभ्यासाठी बापाने धरली छत्री! व्हायरल फोटोने नेटकरीही सुखावले title=

बंगलुरू: सोशल मीडियावर दररोज काहीही व्हायरल होऊ शकतं. या दिवसांमध्ये सोशलमीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याला पाहून प्रत्येक व्यक्ती खुश होत आहे. आणि त्याचं मन प्रेमाने भरून येत आहे. आज फादर्स डे Fathers Day च्या निमित्ताने तर या फोटोवर प्रचंड लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

हा फोटो कर्नाटक म्धील मलनाड परिसरातील आहे. एक व्यक्ती छत्री धरून उभा आहे. पाऊस खुप सुरू आहे. यामध्ये त्यांची मुलगी छत्रीखाली ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून अभ्यास करीत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या चर्चेचा मुद्दा बनला आहे, या फोटोचं देशभरातील इंटरनेट वापरकर्ते कौतुक करीत आहेत.

या फोटोला महेश पुच्चापडी नावाच्या छायाचित्र पत्रकाराने क्लिक केले आहे. दररोज सायंकाळी ही मुलगी आपल्या sslc क्लासच्या अभ्यासाठी याच जागी येत असते. नेटवर्क साठी याजागी येऊन या मुलीला अभ्यास करावा लागतो. फोटो क्लिक केला त्या दिवशी पाऊस सुरू होता.

या फोटोमुळे पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची किती काळजी असते हे दिसून येतंय. हे दृश्य पाहून नेटकरी सुखावले. त्यांनी या फोटो जास्तीत जास्त शेअर करीत कौतुकाचा वर्षाव केला.