आपल्या नवजात बाळाला वाचवण्यासाठी आई-वडिलांची केविलवाणी धडपड

बाळावर पुढच्या उपचारासाठी अजूनही जवळपास ८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी या दाम्पत्याला मदतीची गरज

Updated: Jun 13, 2018, 11:39 AM IST
आपल्या नवजात बाळाला वाचवण्यासाठी आई-वडिलांची केविलवाणी धडपड title=

हैदराबाद : आपल्या अपत्याचा जन्म हा एखाद्या आई-वडिलांसाठी अत्यानंदाचा क्षण असतो... पण, हा क्षण काही के शिवा आणि सई प्रिया या दाम्पत्याला अनुभवता आला नाही... कारण त्यांच्या बाळानं वेळेच्या आधीच या जगात पाऊल ठेवलं... या नवजात बालकाचं वजन गरजेपेक्षा खूपच कमी होतं... त्यामुळे ते गेल्या महिन्याभरापासून डॉक्टरांच्या निगरानीखालीच आहे. आता, या आई-वडिलांना आपल्या अपत्याला वाचवण्यासाठी मदतीची गरज आहे... 

१८ एप्रिल रोजी या बाळाचा सातव्या महिन्यातच सिझेरियनच्या साहाय्यानं जन्म झाला होता. 'लिटिल स्टार चिल्ड्रन हॉस्पीटल'मध्ये या बाळावर आताही उपचार सुरू आहेत. अद्यापही या बाळाचं वजन म्हणावं तसं वाढलेलं नाही.

इवलुशा बाळावर सुरु असलेले उपचार आणि त्याच्या वेदनांनी विव्हळणार बाळ पाहून त्याच्या आईचं काळीज पिळवटून निघतंय... पण, ती मात्र सध्या तिच्या पिलाला पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. गर्भारपणातच ढाळसळलेली प्रियाची तब्येत अजूनही सुधारलेली नाही... प्रिया आपल्या बाळाला कुशीत घेऊन अद्यापही स्तनापान करू शकलेली नाही.

हे सुरू असताना शिवा आपल्या कामावर लक्ष देऊ शकला नाही... आणि त्याला आपल्या जॉबवर पाणी सोडावं लागलं. त्याचा पगारही महिन्याला १५ हजार होता... तोही आता बंद झालाय. त्यामुळे बाळाच्या उपचारासाठी त्याला नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर हात पसरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. 

हॉस्पीटलचं ४.५ लाखांचं बिल चुकवण्यासाठी या दाम्पत्यानं आपले सोन्याचे दागिने विकलेत. पण, बाळावर पुढच्या उपचारासाठी अजूनही जवळपास ८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी या दाम्पत्याला मदतीची गरज आहे. 

कुठे आणि कशी मदत करायची, हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा