फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद

भारत माता की जयच्या घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 22, 2018, 05:18 PM IST
फारुक अब्दुल्ला यांनी 'भारत माता की जय' घोषणा दिल्यानंतर पडसाद title=

जम्मू काश्मीर : भारत माता की जयच्या घोषणा देणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांना श्रीनगरमध्ये मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. श्रीनगरच्या हजरत बल दरगामध्ये ईदच्या निमित्तानं फारूक अब्दुला नमाज पढण्यासाठी आले होते. मात्र दरगातून बाहेर पडताना अब्दुल्ला यांच्याविरोधात जमलेल्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

लोकांनी हातात बुट आणि चप्पल घेऊन शर्म करो शर्म करोच्या जोरदार घोषणा दिल्या. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत अब्दुल्ला यांनी जोरदार भाषण करत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. त्याचेच श्रीनगरमध्ये पडसाद उमटले आहेत.