केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा

शेतकरी आंदोलनं म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलंय. माध्यमांमध्ये झळकण्यासाठी आंदोलन सुरु असल्याचं सांगत त्यांनी शेतकरी संपाची खिल्ली उडवलीय.

Updated: Jun 3, 2018, 10:00 AM IST
केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा title=

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनं म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलंय. माध्यमांमध्ये झळकण्यासाठी आंदोलन सुरु असल्याचं सांगत त्यांनी शेतकरी संपाची खिल्ली उडवलीय.

देशभरातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवस संपाचं हत्यार उपसलंय. या आंदोलनाविषयी पाटणा इथल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना विचारण्यात आलं. त्यावर माध्यमांमध्ये झळकण्यासाठी असं काहीतरी करावं लागतं, असं बेजबाबदारपणाचं उत्तर त्यांनी दिलं. 

देशात दहा ते बारा कोटी शेतकरी आहेत. कुठल्याही आंदोलनात फक्त हजार ते दोन हजार आंदोलक सहभागी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपाला स्टंटबाजी सांगत केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची एकप्रकारे थट्टा केलीय.