हे शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी, कंगना पुन्हा वादात

 अभिनेत्री कंगना राणौतचे वादग्रस्त विधान

Updated: Feb 3, 2021, 01:04 PM IST
हे शेतकरी नसून भारताचं विभाजन करणारे दहशतवादी, कंगना पुन्हा वादात title=

नवी दिल्ली : कृषी आंदोलनाला सातत्याने विरोध करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. पॉपस्टार रिहानाच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना कंगनाच्या भाषेची पातळी घसरली. 'याविषयी कोणी व्यक्त होत नाही कारण ते शेतकरी नसून भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी आहेत असे कंगना म्हणाली. कंगनाने याआधी देखील अशा प्रकारची विधानं केली आहेत. त्यानंतर ६ ब्रॅण्ड्सनी तिच्यासोबतचा करार कायमचा रद्द केला होता. कंगना आपल्या वादग्रस्त विधानांवर ठाम असल्याचे दिसते. 

चीनसारखे देश आपल्या देशावर ताबा मिळवतील आणि अमेरिकेसारखी चिनी वसाहत बनवतील. तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही, जो आमचा देश विकू', असं प्रत्युत्तर कंगनाने रिहानाला दिलं. या ट्वीट वॉरनंतर कंगनावर टीकेची झोड उठतेय.

ब्रॅण्डकडून कॉन्ट्रॅक्ट रद्द 

२६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणावर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आणि टीकास्त्र डागलं. यामध्येच आता सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.

कॉलमनिस्ट आनंद रंगनाथन यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रली आणि निशान साहिब यांच्या झेंडा फडकावल्यावर भाष्य केलं आहे. अवैध झेंडे फडकावणं जेवढं सोप्प वाटतं तेवढं ते नाही. ही जागा काबीज करण्याप्रमाणे आहे. यामागे प्रबल मानसिकता जोडली गेलेली आहे. हे चांगले संकेत नाहीत. मी कधी विचार केला नव्हता की, मला असा दिवस पाहावा लागेल. त्यांनी या ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे की, तुम्ही या गोष्टीने सहमत आहात का?

तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर( सदिच्छादूत) करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत, असं ट्विट कंगनाने केलं आहे.