Farmers Protest : सरकारबरोबरची बैठक रद्द तर सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची बैठक

दिल्लीतल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे (Farmers) शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये आज होणारी बैठक रद्द झाली आहे.  

Updated: Dec 9, 2020, 07:38 AM IST
Farmers Protest : सरकारबरोबरची बैठक रद्द तर सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची बैठक  title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे (Farmers) शिष्टमंडळ आणि केंद्र सरकारमध्ये आज होणारी बैठक रद्द झाली आहे. मात्र आज सिंघू बॉर्डरवर (Sindhu border) दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमधून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणत्या मुद्दयांवर चर्चा होणार आहे. कृषी कायदा (Farm Laws 2020) रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विरोधक राष्ट्रपतींची भेट घेणार

दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विरोधी पक्षांचे नेते आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. या संयुक्त भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश असल्याची माहिती सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच जणांनाच भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी आज संध्याकाळी ५ वाजताची वेळ दिली आहे. 

तोडग्याविना बैठक संपली

Farmers Protest : सरकारबरोबरची बैठक रद्द तर सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची बैठक

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात काल रात्री झालेली बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना आज लेखी प्रस्ताव देणार आहे.. या प्रस्तावावर  शेतकरी विचार करतील.

दरम्यान, आज केंद्र सरकारसोबत बैठक होणार नसल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव हनन मुला यांनी सांगीतले आहे. आज सिंघू बॉर्डरवर दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमधून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे.