Zoom करुन करुन थकाल, पण हा फोटो पिक्सलेट होणार नाही; पाहा भन्नाट जादू

झूम होणाऱ्या चित्राचा 1.15 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. होय, आतापर्यंत या क्लिपला 1 कोटी 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Updated: Jul 28, 2022, 10:34 AM IST
Zoom करुन करुन थकाल, पण हा फोटो पिक्सलेट होणार नाही; पाहा भन्नाट जादू title=

मुंबई : झूम होणाऱ्या चित्राचा 1.15 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. होय, आतापर्यंत या क्लिपला 1 कोटी 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 10 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी ही अप्रतिम कलाकृती लाईक केली आहे. ही भव्य कलाकृती तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव वास्कंगे असे आहे.

ज्याला इन्स्टाग्रामवर 49.4 हजार युजर्स आणि ट्विटरवर 5 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. त्याच्या बायोनुसार, तो एक चित्रकार आहे ज्यांच्या कलेचे जगभरात लाखो कौतुक आहेत. आजकाल त्यांची एक 'infinite stories' इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

आपण सर्वजण अनेकदा स्वतःच्या किंवा इतरांच्या चित्रांवर झूम इन करतो. ती चित्रे खूप झूम केल्यानंतर, पिक्सेल फाटू लागतात. पण या कलाकाराने इतकं अप्रतिम काम केलंय की त्याची कलाकृती बघून बघून कंटाळा येईल... पण चित्र संपणार नाही. विश्वास बसत नसेल तर आधी पूर्ण व्हिडिओ पहा.