स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दूल करीम तेलगीचा मृत्यू

बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Oct 26, 2017, 05:56 PM IST
स्टॅम्प घोटाळ्यातील अब्दूल करीम तेलगीचा मृत्यू title=

बंगळुरू : बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यांचा मृत्यू झाला आहे. तेलगी हा बंगळुरूतीला व्हिक्टोरीया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. अब्दूल करीम तेलगी हा बंगळुरूच्या सेन्ट्रल जेलमध्ये स्टॅम्प घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत होता. 

तेलगीने हजारो करोडो रूपयांचे बनावट स्टॅम्प छापून चूना लावला होता, मात्र त्याची शिक्षाही अब्दूल करीम तेलगीला भोगावीच लागली. एकदा 2016 मध्ये अब्दूल करीम तेलगी हा जिवंत असून तो बंगळुरूच्या जेलमध्ये बंद असल्याचा पुरावा, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता.

तेलगीला स्टॅम्प घोटाळ्यात निर्दोष असल्याचा निर्णय आल्यानंतर सीबीआयने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेलगी विरोधात डझनवार बनावट स्टॅम्प बनल्याचे गुन्हे दाखल होते. तसेच तेलगीचा अंत हा शिक्षा भोगत असतानाच झाला. अब्दुल करीम तेलगीला जीवघेणा आजार असल्याच्या अफवाही मध्यंतरी आल्या होत्या.