बवाना आगप्रकरणी कारखाना मालकाला अटक

बवाना औद्योगिक वसाहतीमधील आगीप्रकरणी कारखाना मालकाला अटक करण्यात आलीय.

Updated: Jan 21, 2018, 10:41 PM IST
बवाना आगप्रकरणी कारखाना मालकाला अटक  title=

नवी दिल्ली : बवाना औद्योगिक वसाहतीमधील आगीप्रकरणी कारखाना मालकाला अटक करण्यात आलीय. मनोज जैन असं या कारखाना संचालकाचं नाव आहे. या कारखान्यात स्टेज शो आणि होळीसाठी वापरण्यात येणा-या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.

घटनास्थळावरुन मिळालेल्या फटाक्यांच्या पाकिटांवरुन हेच स्पष्ट होत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दिल्लीतील या आगीत होरपळून १७ जणांचा मृत्यू झाला होता.