Zee Media आणि अदानी ग्रूपमध्ये करार? काय व्हायरल पोस्टमागचं सत्य?

Zee Media आणि अदानी ग्रूपमध्ये कोणताही करार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका झी समुहाचं आवाहन 

Updated: Feb 12, 2022, 09:35 PM IST
Zee Media आणि अदानी ग्रूपमध्ये करार? काय व्हायरल पोस्टमागचं सत्य? title=

मुंबई : कॉर्पोरेट जगात आणि सोशल मीडियावर एक बातमी सध्या वेगानं व्हायरल होत आहे. ही बातमी आहे झी मीडिया आणि अदानी ग्रूपच्या कराराची. झी मीडियाआणि अदानी एंटरप्रायझेस यांच्यात भागभांडवलांची विक्री रोखीने झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गौतम अदानी आणि एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सुभाष चंद्रा यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, झी मीडियाने व्हायरल होत असलेल्या या बातमीचं खंडन केलं आहे. अशा प्रकारच्या खोट्या आणि निरर्थक बातम्या पसरवल्या जात असल्याचं डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं आहे. 

मायनॉरिटी शेयरहोल्डर्स  आणि जनतेचे हित लक्षात घेऊन डॉ. सुभाष चंद्रा आणि गौतम अदानी यांच्यात असा कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर अशी कोणतीही बातमी आली असेल तर त्यावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन झी समूहाच्या वतीनं करण्यात आलं आहे.