Shraddha Walker Murder Case ला नवं वळण; मृत्यूवेळी ती गरोदर?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्याकांडाला एक वेगळंच वळण प्राप्त झालं असून समोर येणाऱ्या बातम्यांमधून आता एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. 

Updated: Nov 17, 2022, 06:41 PM IST
Shraddha Walker Murder Case ला नवं वळण; मृत्यूवेळी ती गरोदर? title=
shraddha Walkar

Fact Check Sharddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्येला (Shraddha Murder Case) आता एक वेगळंच वळण आलं आहे. सुत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार श्रद्धाची हत्या झाली तेव्हा ती गरोदर असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यात अद्याप पुराव्यानिशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सदर माहितीच्या आधारे डॉक्टरांसोबत केलेल्या चॅटिंगवरून आणि प्रिसक्रिब्शनवरून ती गरोदर (Pregnant) होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिल्ली पोलीससुद्धा (Delhi Police) याबाबत चौकशी करत असून तिच्या गरोदर असल्याबाबतची खरी माहिती शोधण्याच्या तपासात आहेत. 

लिव्ह इन रिलेशनशनपमध्ये असताना हे काय घडलं?  

आफताब आणि श्रद्धा हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) होते. लग्नाचं आमीष दाखवून आफताब तिला दिल्लीला घेऊन गेला. lत्याच्यासाठी श्रद्धानं आपल्या आई-वडिलांशीही संपर्क सोडला होता. दिल्लीला गेल्यानंतर ती अफताबशी लग्न करण्याचा हट्ट धरत होती त्याचाच राग येऊन आफताबनं तिचा गळा दाबून तिला संपवलं आणि तिचं प्रेत लपवण्यासाठी त्यानं घरात एक फ्रिज विकत घेतला. त्यामध्ये तिच्या शरीराचे केलेले 35 तुकडे त्यानं लपवून ठेवले होते. त्यानंतर त्यानं तिच्या शरीराचे तुकडे हळूहळू जंगलातही फेकायला सुरूवात केली होती.

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

सहा महिन्यांपुर्वी आफताबनं ही हत्या केली होती. श्रद्धाच्या हत्येनंतर फ्रीजमध्ये तिचं प्रेत असताना आफताबनं आपल्या दुसऱ्या प्रेयसीलाही घरी बोलावलं होतं. त्याचबरोबर पोलीस तपासणीत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करताना आफताब जखमीही झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार असेही कळते की आफताब हा शेफ होता अशीही माहिती तपासातून समोर आली आहे. गळा दाबून मारणं सोप्पं होतं पण तुकडे करणं कठीण असं धक्कादायक वक्तव्यही त्यानं पोलिसांकडे केलं आणि ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सध्या या सगळ्याच प्रकारनं 2012 साली झालेल्या निर्भया हत्याकांडानंतर 2022 साली श्रद्धा वालकरच्या हत्येनं संपुर्ण देशात खळबळ माजली आहे. आज आफताबला दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार आहे.