Extra marital affair: बायकोला लफडं कळू नये म्हणून व्हिसाची पानं टराटरा फाडली, पण...

Crime News : कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगून गर्डफ्रेंडसोबत मालदीवला एन्जॉय करत होता. फुल मस्ती धमाल केल्यानंतर त्याने पुन्हा भारतात प्रवासाला सुरूवात केली पण...

Updated: Oct 27, 2022, 10:58 PM IST
Extra marital affair: बायकोला लफडं कळू नये म्हणून व्हिसाची पानं टराटरा फाडली, पण... title=
Extra marital affair Crime News

Crime News Extra marital affair: विवाहबाह्य प्रेमप्रकरणाची अनेक उदाहरणं सध्याच्या युगात पहायला मिळतात. सोशल मीडियावर (Social Media) यासंबंधी चर्चा देखील होताना दिसते. प्रेम प्रकरणं लपवण्यासाठी कोण कोणती शक्कल लढवेल सांगता येत नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. नवऱ्याने बायकोपासून प्रेमप्रकरण (Extra marital affair) लपवण्यासाठी असं काही केलं की...त्याची थेट तुरूंगात रवानगी झाली. (Extra marital affair engineer had to go to jail after coming from a trip to the maldives Crime News)

नेमकं काय झालं...

अभियंता आपल्या बायकोला चोरून प्रेयसीसोबत मालदीवला (Maldives) गेला. प्रेयसीसोबत मस्त मालदीव ट्रीप फुल टू धमाल देखील केली. बायकोला मालदीव ट्रीपबद्दल (Trip) काही कळू नये, यासाठी अभियंता विचार करत होता. ऑफिशियल कामानिमित्त परदेशात जात असल्याचं त्यानं बायकोला सांगितलं होतं.

कामानिमित्त परदेशात जात असल्याचं सांगून गडी गर्डफ्रेंडसोबत मालदीवला एन्जॉय करत होता. फुल मस्ती धमाल केल्यानंतर त्याने पुन्हा भारतात प्रवासाला सुरूवात केली. यावेळी त्याला बायकोची धास्ती लागली होती. त्यामुळे त्याने पुरावे संपवण्याचा प्रयत्न केला. मालदीव ट्रीपचे गुपीत पत्नीला समजू नये म्हणून चक्क पासपोर्टमधील मालदीव (Trip to the maldives) व्हिसाचा शिक्का असलेली पाने टराटरा फाडली.

आणखी वाचा - झोपेत गाडी चालवत होता डिलीव्हरी बॉय, डुलक्या घेता घेता..., पाहा Trending Video

तुरूंगात रवानगी - 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला तेव्हा इमिग्रेशन अधिकाऱ्यानं त्याचा पासपोर्ट दाखवण्यास सांगितला. मात्र, पासपोर्टमध्ये 3 ते 6 आणि 31 ते 34 पानं गायब असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर अभियंत्याची दैना झाली. अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. अभियंत्याला पोलिसांनी ताब्यात घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.