देशात विकसीत होत असलेल्या Corona Vaccineवर आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.     

Updated: Nov 23, 2020, 09:07 AM IST
देशात विकसीत होत असलेल्या Corona Vaccineवर आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण  title=

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी देशातील रूग्ण वाढीचा दर काही प्रमाणात मंदावला होता. परंतू आता पुन्हा रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या विषणूवर मात मिळवण्यासाठी जगातील संपूर्ण देश Corona Vaccine वर प्रचंड मेहनत घेत आहेत. भरतात देखील या लसी संबंधी अनेक शोध सुरू आहेत. त्यामिळे आता लवकरच भारतात Corona Vaccine तयार होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय सरकार Corona Vaccine नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य ती रूपरेषा आखत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 

दरम्यान आरोग्य मंत्री ( Union Health Minister On Covid Vaccine) डॉ. हर्षवर्धन (Harsh Vardhan) यांनी Corona Vaccineबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. देशात तयार होत असलेल्या Corona Vaccineवर येत्या दोन किंवा तीन महिन्यांमध्ये अंतिम परिक्षण पूर्ण होवू शकतं. हर्षवर्धन यांच्या या वक्तव्यामुळे Corona Vaccine लवकरच येण्याची शक्यता वाटत आहे.  

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने या महिन्यात COVAXINचं तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरू केलं आहे. ज्यामध्ये २६ हजार स्वयंसेवक सामिल आहेत. शिवाय जुलै महिन्यापर्यंत २० ते २५ कोटी नागरिकांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

त्याचप्रमाणे, लस वितरणात प्राधान्य दिले जाणार आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना प्राधान्य दिले जाईल. मग ५०-६५ वर्षे वयोगटातील लोकांना प्राधान्य दिले जाईल. 

त्यानंतर ५० वर्षांखालील लोक ज्यांना इतर रोग आहेत त्यांना लस दिली जाणार आहे. अशा प्रकारे भारतात लवकरच कोरोनावर लस येइल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.