अमेठी : काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याबाबत देखील देशात चर्चा आहे. २०१४ च्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी या राहुस गांधींना येथे कडवं आव्हान दिलं होतं. त्यानंतर पराभवानंतरही ही त्यांनी या मतदारसंघात जनसंपर्क सुरु ठेवला होता. राहुल गांधी यांच्यापुढे आपला मतदारसंघ कायम ठेवण्याचं आव्हान आहे. भाजपने पुन्हा एकदा स्मृती इराणी यांनी उमेदवारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचं सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल येणं सुरु झालं. एक्झिट पोलमध्ये अमेठीमध्ये स्मृती इराणी या राहुल गांधींना पुन्हा एकदा टक्कर देताना दिसत आहेत. येथे राहुल गांधींना विजय सोपा नाही आहे. अमेठीमध्ये ६ मेला मतदान झालं होतं.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा तिसऱ्यांदा विजय झाला होता. आम आदमी पक्षाने येथून कुमार विश्वास यांनी उमेदवारी दिली होती. स्मृती इराणी यांना २०१४ मध्ये ३ लाखाहून अधिक मतं मिळाली होती.