मुंबई : पीएफधारकांसाठी (EPFO) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईपीएफओने मोठा निर्णय घेतलाय. पीएफ निवृत्तीवेतनधारकांना (Pensioners) लाईफ सर्टिफिकेट (Life Cetificate) जमा करण्याची 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. मात्र ही मुदत प्रत्येक पेन्शनधारकासाठी नाही. याबाबत ईपीएफओने माहिती दिलीय. ज्या कर्मचाऱ्यांना एम्पलॉयी पेन्शन स्कीम EPS 1995 नुसार निवृत्तीवेतन मिळतं, त्यांना लाईफ सर्टिफिकेटबाबत काहीशी सवलत देण्यात आली आहे. या निवृत्तीवेतनधारकांना कधीही लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. (epfo update pensipners now submit life certificate anytime know details)
ईपीएस पेन्शनर्सचं लाईफ सर्टिफिकेट हे जमा केल्यापासून पुढील 1 वर्षापर्यंत वैध राहिलं. ईपीएफओने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मात्र 1 वर्षाच्याआधीच पुन्हा लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. उदाहरण, तुम्ही 1 डिसेंबर ला लाईफ सर्टिफिकेट जमा केलं असेल, तर पुढील वर्षाच्या 1 डिसेंबरआधी लाईफ सर्टिफिकेट सादर करावं लागेल. अन्यथा जानेवारी 2023 मध्ये मिळणारी पेन्शन मिळणार नाही.
EPS’95 पेंशनभोक्ता अब किसी भी समय जीवन प्रमाण पत्र जमा कर सकते हैं जो जमा करने की तारीख से 1 वर्ष के लिए वैध होगा।#EPFO #Pension #AmritMahotsav @AmritMahotsav pic.twitter.com/gxfzPpElVv
— EPFO (@socialepfo) November 17, 2022
पेन्शनर्स आपलं लाईफ सर्टिफिकेट हे कॉमन सर्व्हिस सेंटर, पोस्ट ऑफिस, Umang App तसेच ईपीएफओच्या कार्यालयात जमा करु शकतात. पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेटसह पीपीओ नंबर, आधार नंबर, बँक अकाउंटची माहिती आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.