तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर

पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.

Updated: Nov 12, 2022, 09:35 AM IST
तुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर  title=

EPFO Benefits: आपण सगळेच नोकरी करतो आणि आपल्याला आत्तापासूनच आपल्या भविष्याचे प्लॅनिंग (Financial Planning) करायचे असते. त्यामुळे पुढे आपण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा आपल्याला आपल्या रिटार्ड प्लॅनिंगही (Retirement Plan) आत्तापासूनच करावं लागतं. त्यासाठी आपण भविष्य निर्वाह निधी संघटना यांचा चांगलाच फायदा करून घेतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या भविष्याची फारशी चिंता राहत नाही. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारवर्गांसाठी (EPFO) भविष्य निर्वाह निधी खातं उघडता येते. हा एक चांगला पर्याय असतो. तुमच्या पगारातील 12 टक्के हे या योजनेअंतर्गत जमा होतात. त्यामुळे याचा निवृत्तीपर्यंत चांगला निधी तयार होतो. यावर 8.1 टक्के व्याज (Interest Rate) मिळते. 

पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता. जो तुम्हाला तुमच्या रिटार्यड प्लॅनमध्ये मदत करेल. तुम्हाला यासाठी फक्त थोडासा हिशोब करावा लागेल. समजा तुमचा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून 15,000 रुपये आहेत. तुमचे वय 35 वर्षे असल्यास, निवृत्तीच्या वेळेपर्यंत म्हणजेच 58 वर्षे वयापर्यंत, तुमच्याकडे 54 लाख रुपयांचा निवृत्ती निधी (Retirement Amount) तयार असेल. EPF योजनेत 58 वर्षांपर्यंत जास्तीत जास्त योगदान देऊ शकतात.

हेही वाचा : Viral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद

तुमच्या निवृत्तीच्या वेळेस तुम्हाला किती पैसे मिळू शकतात? जाणून घ्या या सोप्या कॅलक्यूलेशननं : 

मूळ वेतन + DA = ₹15,000 
तुमचं वय = 35 वर्षे 
सेवानिवृत्तीचं वय = 58 वर्षे 
कर्मचारी मासिक योगदान = 12% 
नियोक्ता मासिक योगदान = 3.67 टक्के 
EPF वर व्याज दर = 8.1% 
वार्षिक पगार वाढ = 10 

वरची माहिती ही साधारण आहे. जी प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असणं अनिवार्य आहे. यावरून तुम्हाला हिशोब करणे सोप्पे जाऊ शकते. तुमचा मुळ पगार आमि महागाई भत्ता हा एकत्रित केला जातो आणि त्यातून तुमचे कर्मचारी मासिक (Monthly Income) योगदान वजा होते. त्याचसोबतच तुमचे नियोक्ता मासिक योगदानही वजा होते. या दोन वजा केलेल्या रक्कमांना एकत्रित केले जाते. पहिल्या वर्षी 15,000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात एकूण मासिक योगदान रुपये 2350 (रु.1800+550) असते. 

हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....

पाहा तुमचं फायनल कॅलक्यूलेशन : 

कर्मचार्‍यांचा मूळ पगार + महागाई भत्ता = ₹15,000 (EPF मध्ये) 
कर्मचारी योगदान = ₹15,000 पैकी 12% = ₹1800 
EPF मध्ये नियोक्ता योगदान = ₹15,000 पैकी 3.67% = ₹550  

कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या (DA) 12% रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. नियोक्त्याची 12 टक्के रक्कम दोन भागांमध्ये जमा केली जाते. नियोक्त्याच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन खात्यात जमा केले जातात आणि उर्वरित 3.67 टक्के EPF खात्यात जातात. 

व्याज किती असते? 

ईपीएफओच्या नियमांनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तारखेला शिल्लक रकमेतून वर्षभरात कोणतीही रक्कम काढली तर त्यावर 12 महिन्यांचे व्याज कापले जाते. मासिक चालू शिल्लक आणि व्याज दर / 1200 ने गुणाकार केला जातो. ही रक्कम वर्षाखेरीज जमा केली जाते.