EPFO New Rules:पैशांची अचानक गरज पडली तर PF मधून काढता येतील एडवांस 1 लाख रुपये; जाणून घ्या प्रोसेस

 कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)ने एक सर्कुलर जारी केले आहे. 

Updated: Jul 9, 2021, 04:36 PM IST
EPFO New Rules:पैशांची अचानक गरज पडली तर PF मधून काढता येतील एडवांस 1 लाख रुपये; जाणून घ्या प्रोसेस title=

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)ने एक सर्कुलर जारी केले आहे. तुम्ही मेडिकल एमरजन्सीसाठी पीएफ खात्यातून एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम आगाऊ काढू शकता.

कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करीत आहे. त्यापैकी एक निर्णय म्हणजेच EPF मधून 1 लाखापर्यंतची रक्कम आगाऊ काढता येऊ शकते. हा असा पैसा आहे की, कोणत्याही मेडिकल एमरजन्सीसाठी काढता येऊ शकतो. 

या निर्णयाअंतर्गत फक्त कोरोना संसर्गामुळे नाही तर इतर कोणत्याही आजारांच्या उपचारासाठी पैसे काढू शकता. कर्मचारी किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मेडिकल एडवांसच्या मागणीपत्रासह आणि एक पत्र जमा करणे गरजेचे ठरेल. सोबतच रुग्ण आणि रुग्णालयाची माहिती देणे गरजेचे आहे.

याआधीसुद्धा पीएफ धारकांसाठी मेडिकल एमरजन्सीमध्ये पैसे काढण्याची सुविधा होती. परंतु हे पैसे तुम्हाला मेडिकल बिल जमा केल्यानंतर मिळत असत. परंतु आता मेडिकल एडवांसच्या सर्व्हिसच्या माध्यमातून तुम्हाला विना बिल पैसे मिळू शकतात. अप्लाय केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.

 www.epfindia.gov.in संकेतस्थळ सुरू करा.
 ऑनलाईन सेवांवर क्लिक करा
 येथे क्लेम (Form 31,19,10,10D)फॉर्म भरा
 तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक नोंदवा. त्याला सत्यापित करा
 'प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम' या पर्यायावर क्लिक करा
 ड्राप डाऊनमधून पीएफ एडवांस निवडा. (Form 31)
 येथे तुम्हाला पैसे काढण्याचे कारण नोंदवावे लागेल.
 अपेक्षित रक्कम नोंदवा
 चेक किंवा पासबुकची स्कॅन कॉपी अपलोड करा.
 येथे गेट आधार ओटीपी येथे क्लिक करा आणि आधार लिंक मोबाईलवर आलेला ओटीपी नमूद करा
 आता तुमचा क्लेम फाईल झाला आहे.