कानपूर : कानपूर पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे यांचे जवळचे असलेले बौवा दुबे आणि प्रभात मिश्रा यांना पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. प्रभात मिश्राला पोलिसांनी फरीदाबादमधील हॉटेलमधून अटक केली होती. प्रभात पोलीस कोठडीतून पळून जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चकमकीत प्रभात मिश्रा ठार झाला.
याशिवाय विकास दुबेचा आणखी एक साथीदार बौवा दुबे याचा इटावा येथे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बौवा दुबे याने रात्री उशिरा माहेवा जवळ महामार्गावर स्विफ्ट डिजायर कार लुटली. त्याच्याबरोबर आणखी तीन गुंड होते. पोलिसांना या दरोड्याची माहिती मिळताच त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या कचूरा रोडवर चौघांना घेरले.
पोलीस आण बौवा दुबे यांच्यात झालेल्या गोळीबारात बौवा दुबे ठार झाला आहे. मात्र, त्याचे तीनही साथीदार तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. इटावा पोलिसांनी आसपासच्या जिल्ह्यास सतर्क केले आहे. पोलिसांनी बौवा दुबे यांच्यावर 50 हजारांचे बक्षीस ठेवले होते. कानपूर गोळीबारातही तो आरोपी होता.
प्रभात मिश्राच्या चकमकीबद्दल सांगताना आयजी मोहित अग्रवाल म्हणाले की, पोलिसांची टीम फरीदाबादहून प्रभातला घेऊन येत होती. वाटेत कार पंक्चर झाली. यादरम्यान प्रभातने पोलिसांचे हत्यार हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर चकमकीत प्रभात ठार झाला आहे. काही पोलीसही जखमी झाले आहेत.
विकास दुबे फरीदाबादमधील हॉटेलमध्ये लपून बसल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. विकास दुबे तेथे सापडला नाही, परंतु प्रभात मिश्रा आणि इतर दोन जण पकडले गेले.