श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरा भागात गुरुवारी सकाळी सुरक्षादल आणि दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. बांदीपोराच्या हाजिन भाग सुरक्षादलानं घेरलाय. या भागात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे.
#JammuAndKashmir: An encounter has started between terrorists and security forces in Bandipora's Hajin. 2-3 terrorists are reportedly trapped. More details awaited.
— ANI (@ANI) August 30, 2018
बुधवारीही अनंतनागच्या मुनवार्ड भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू होती. यामध्ये सुरक्षादलानं दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं. ठार केलेले दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी निगडीत होते. यातल्या एकाचं नाव अल्ताफ कचरू होतं तर दुसऱ्याची ओळख शिनाख्त उमर राशिद नावानं पटलीय. सुरक्षादलानं चकमकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद केल्या होत्या.
यानंतर बुधवारी दुपारी शोपियामध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला केला. त्यांच्या गोळीबारात चार पोलीस शहीद झाले. ही घटना शोपियाच्या अराहामा फळ बाजाराजवळ झाली. दहशतवादी पोलिसांकडून तीन एके 47 रायफल घेऊन फरार झाले.