नवी दिल्ली: बॉउंस कंपनीची इंफिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 2 डिसेंबर रोजी लाँच केली जाणार असून लॉन्चच्या तारखेपासून स्कूटरचे बुकिंग देखील सुरू केले जाणार आहे. इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Bounce ने ही घोषणा केली आहे. कंपनी लॉन्च झाल्यानंतर पुढील वर्षापासून ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना देण्यास सुरुवात करणार आहे.
Ola च्या धर्तीवर, Bounce EV देखील 499 रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करता येईल. बाउन्स इन्फिनिटी स्कूटर स्मार्ट, डिटेचेबल लिथियम-आयन बॅटरीने सुसज्ज आहे. गरज भासल्यास या स्कूटरमधून बॅटरी वेगळी करता येते आणि सोयीनुसार ती चार्ज करता येते.
Bounce EV नवीन स्कूटरमध्ये एक अनोखा '‘Battery As A Service’' पर्याय देखील देत आहे जिथे स्कूटर बॅटरीशिवाय खरेदी केली जाऊ शकते, ज्यामुळे ही स्कूटरची किंमत कमी आहे
यानंतर, ग्राहक बोनसच्या बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्कच्या मदतीने चार्ज जमा करू शकतात आणि डिस्चार्ज केलेली बॅटरी पूर्ण चार्ज केलेल्या बॅटरी स्कूटरने बदलू शकतात. या पर्यायामुळे, तुम्ही बॅटरीशिवाय स्कूटर बॅटरीच्या स्कूटरपेक्षा 40% कमी किमतीत खरेदी करू शकता. (Bounce Infinity)
नवीन Infinity EV बद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
दरम्यान, Bounce ने घोषणा केली आहे की, 2021 मध्ये, 22 Motors चे 100% अधिग्रहन केले असून सुमारे 52 कोटी रुपयांना कंपनी विकत घेतली आहेत.
या करारांतर्गत, इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने राजस्थानमधील 22 मोटर्सच्या भिवाडी प्लांट आणि तेथील मालमत्तेवर हक्क संपादन केला आहे.
वर्षाला 1,80,000 स्कूटर निर्माण करण्याची या प्लॅंटची क्षमता आहे. याशिवाय कंपनीने दक्षिण भारतात नवीन प्लांट सुरू करण्याचे धोरणही जाहीर केले आहे.
Bounce Infinity, Bounce Electric Scooter, Electric Scooter, Bounce Electric, Bounce EV,