बंगळुरु : जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालीये. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. १५ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण २२२ जागांसाठी मतदान होत आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क जावणार आहेत. हे मतदान ईव्हीएम मशीनवर होतंय.
दरम्यान कर्नाटकमधील आर.आर. नगर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कर्नाटक निवडणू आयोगानं १२ मे ऐवजी २८ मे रोजी घेण्याचं ठरवलंय. ३१ मे रोजी इथं मतमोजणी होईल. इथल्या जलाहल्लीतील एका फ्लॅटमध्ये गेल्या मंगळवारी १० हजार बानवट निवडणूक ओळखपत्र जप्त करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगानं इथलं मतदान पुढे ढकलले आहे.
कर्नाटकात बंगळुरुमधील राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर आर.आर. नगर मतदार संघातील मतदान लांबणीवर टाकण्यात आलेय. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर भाजपला रोखण्याचं काँग्रेसपुढे आव्हान असणार आहे.