Election results 2019 : नरेंद्र मोदी या दिवशी शपथ घेणार?

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.

Updated: May 23, 2019, 02:32 PM IST
Election results 2019 : नरेंद्र मोदी या दिवशी शपथ घेणार? title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. लागोपाठ दुसऱ्यांदा भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. भाजपने अशी दमदार कामगिरी केल्यानंतर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आहे.

२६ मेरोजी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. २६ मेरोजीच भाजपने संसदीय दलाची बैठक बोलावली आहे. याच दिवशी भाजप त्यांचा संसदीय दलाचा नेता निवडला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

२०१४ सालीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ मेरोजीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २०१४ सालच्या मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला सार्क देशांचे प्रमुख उपस्थित राहिले होते. यामध्ये पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही समावेश होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला कोणाला बोलावतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

पाहा राज्यातल्या सगळ्या निवडणुकांचे निकाल